-
'राईट लाईव्हलीहूड पुरस्कार फाउंडेशन (Right Livelihood Award Foundation)' मार्फत सादर करण्यात येणाऱ्या राईट लाईव्हलीहूड पुरस्कारांकरिता २०२० सालासाठी ४ विजेते जाहीर करण्यात आले आहेत.
ठळक मुद्दे
-
'राईट लाईव्हलीहूड पुरस्कार' ला स्टॉकहोममधील पर्यायी नोबेल पुरस्कार म्हणूनही ओळखले जाते.
-
सदर ४ कार्यकर्त्यांनी समानता, लोकशाही, न्याय आणि स्वातंत्र्य यातील योगदानाबद्दल सामायिकरित्या २०२० सालचा हा पुरस्कार जिंकला आहे.
विजेत्यांची नावे
-
अॅलेस बियालियात्स्की (बेलारूस)
-
नसरीन सोतौडेह (इराण)
-
ब्रायन स्टीव्हनसन (अमेरिका)
-
लोट्टी कनिंघम व्रेन (नायकाराग्वा)
'राईट लाईव्हलीहूड पुरस्काराबाबत' महत्वपूर्ण माहिती
-
प्रथम पुरस्कार प्रदान वर्ष: १९८० साली पहिल्यांदा राईट लाईव्हलीहूड पुरस्काराचे अनावरण करण्यात आले होते.
-
पुरस्कार प्रदानकर्ता देश: स्वीडन देशामार्फत सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
-
पुरस्कार सादरकर्ते: 'राईट लाईव्हलीहूड पुरस्कार फाउंडेशन (Right Livelihood Award Foundation)' मार्फत सदर पुरस्कार सादर करण्यात येतो.
-
पुरस्कार प्राप्त पात्रता: आजघडीला जगातील सर्वात त्वरित अशा आव्हानांचे व्यावहारिक आणि अनुकरणीय निराकरण उपलब्ध करून देण्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सदर पुरस्कार दिला जातो.