• भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) 'रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (Reserve Bank Innovation Hub - RBIH)' ची निर्मिती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • तंत्रज्ञानाचा यथोचित फायदा घेऊन नवीन यंत्रणेला चालना देणाऱ्या वातावरणाची निर्मिती करून आर्थिक क्षेत्रातील नवनिर्मितीला प्रोत्साहन देणे हे सदर इनोव्हेशन हबचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • RBIH वित्तीय क्षेत्रातील संस्था, तंत्रज्ञान उद्योग आणि शैक्षणिक संस्थांशी सहकार्य करण्याचा प्रयत्न करेल.

  • विचारांच्या देवाणघेवाणीसाठी आर्थिक नवकल्पनांशी संबंधित नमुनांच्या विकासासाठी प्रयत्नांचे समन्वय देखील RBIH मार्फत करण्यात येईल अशी अपेक्षा आहे.

  • RBIH चे संचालन १० सदस्यीय गव्हर्निंग कौन्सिलद्वारे (Governing Council - GC) करण्यात येईल.

  • RBIH चे पहिले अध्यक्ष म्हणून श्री सेनापति (क्रिस) गोपालकृष्णन (सह-संस्थापक आणि माजी सह-अध्यक्ष, इन्फोसिस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

RBI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होय.

  • सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.