-
कोविड-१९ संबंधित तणावग्रस्त मालमत्तांच्या निराकरणासाठी आर्थिक मापदंड सुचविण्याकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India - RBI) ख्यातनाम बँकर के.व्ही. कामथ यांच्या नेतृत्वाखाली एक तज्ञ समिती गठीत केली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर समिती RBI कडे ३० दिवसांच्या कालावधीत बदल करण्यासह सूचित करणाऱ्या शिफारसी प्रदान करेल.
-
समितीचे अन्य सदस्य दिवाकर गुप्ता आणि टी. एन. मनोहरन असतील.
-
अश्विन पारेख हे रणनीती सल्लागार म्हणून कार्यरत असतील.
-
भारतीय बॅंक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
RBI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.
-
मुख्यालय: मुंबई येथे RBI चे मुख्यालय आहे.
-
स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.