-
'इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्समार्फत (Indo-American Chamber of Commerce - IACC)' बिझनेस आयकॉन रतन टाटा यांना भारत-यूएसएच्या बिझनेस रिलेशनशिपमधील अग्रगण्य भूमिकेबद्दल आणि जागतिक स्तरावरील नेतृत्वामधील त्यांच्या आजीवन कामगिरीबद्दल त्यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
'IACC कोविड योद्धा पुरस्कार (COVID Crusader Award) - २०२०' च्या व्हर्च्युअल कार्यक्रमात सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
-
IACC मार्फत प्रथमच कोणत्याही व्यक्तीला जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
IACC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: IACC म्हणजेच Indo-American Chamber of Commerce अर्थात इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स होय.
-
स्थापना वर्ष: १९६८ मध्ये IACC ची स्थापना झाली होती.
-
राष्ट्रीय अध्यक्ष: पूर्णचंद्रराव सुरपानेनी हे सध्या IACC च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र येथे IACC चे मुख्यालयाचे ठिकाण आहे.