-
२०२० सालाचा 'युवा गणित तज्ज्ञांसाठीचा रामानुजन पुरस्कार (Ramanujan Prize for Young Mathematicians)' ब्राझीलच्या रिओ डी जनेरियोमधील शुद्ध आणि उपयोजित गणित संस्थेतील (Institute for Pure and Applied Mathematics - IMPA) गणिततज्ज्ञ डॉ. कॅरोलिना अराझो यांना जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
डॉ. अराझो यांचे कार्यक्षेत्र द्विभाषिक भूमितीवर केंद्रित आहे.
-
विकसनशील देशातील बीजगणित भूमितीमध्ये कार्य करणाऱ्या संशोधकाला सदर पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतो.
-
सैद्धांतिक भौतिकीसाठी आंतरराष्ट्रीय केंद्र (International Centre for Theoretical Physics - ICTP) आणि आंतरराष्ट्रीय गणित संघाच्या (International Mathematical Union - IMU) सहकार्याने भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत (Department of Science and Technology) सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
IMU बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: IMU म्हणजेच International Mathematical Union अर्थात आंतरराष्ट्रीय गणित संघ होय.
-
सध्याचे अध्यक्ष: कार्लोस केनिग हे सध्या IMU चे अध्यक्ष आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: बर्लिन, जर्मनी हे IMU च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९२० साली IMU ची स्थापना करण्यात आली होती.
-
पालक संस्था: आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषद (International Science Council) ही IMU ची पालक संस्था आहे.