• 'सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार (Subhash Chandra Bose Aapda Prabandhan Puraskar) २०२१' डॉ. राजेंद्र कुमार भंडारी यांना वैयक्तिक वर्गात प्रदान करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • संस्थात्मक प्रकारात शाश्वत पर्यावरण व पर्यावरणीय विकास संस्थेला (Sustainable Environment and Ecological Development Society - SEEDS) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

  • संस्थात्मक प्रकारात ५१ लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र आणि वैयक्तिक वर्गात ५ लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे सदर पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्काराबाबत महत्वपूर्ण माहिती

  • आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये भारतातील व्यक्ती तसेच संस्थांकडून देण्यात आलेल्या अनमोल योगदानाची व सेवेची दखल घेऊन सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

  • २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारमार्फत हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो.