-
भारताचे माजी दिग्गज व अनुभवी अॅथलेटिक प्रशिक्षक पुरुषोत्तम राय यांचे नुकतेच निधन झाले. भारतात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या प्रशिक्षकांना दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार अर्थात द्रोणाचार्य पुरस्कारासाठी त्यांचे नाव निश्चित झाले होते.
ठळक मुद्दे
-
अॅथलेटिक्समध्ये द्रोणाचार्य पुरस्कार जिंकणारे कर्नाटक राज्यातील ते तिसरे व्यक्ती ठरले होते.
-
वंदना राव, प्रमिला अयप्पा, एमके आशा, ईबी शिला, रोजा कुट्टी, अश्विनी नाचप्पा, मुरली कुट्टन आणि जीजी प्रमिला या अव्वल क्रमांकाच्या अॅथलीट्सना त्यांनी प्रशिक्षण देण्याचे कार्य केले होते.
-
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२० च्या विजेत्यांमध्ये सन २०२० सालासाठी पुरुषोत्तम राय यांच्या नावाची घोषणा द्रोणाचार्य पुरस्कारासाठी करण्यात आली होती.
-
भारतीय संघाला पुरुषोत्तम राय यांनी १९८७ च्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत (World Athletics Championship), १९८८ सालच्या एशियन ट्रॅक आणि फील्ड चँपियनशिप (Asian Track and Field Championships) आणि १९९९ सालच्या SAF गेम्ससाठी प्रशिक्षण दिले होते.