-
मास्टरकार्ड (Mastercard) आणि 'संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय विकास एजन्सी (United States Agency for International Development - USAID)' यांनी 'महिला जागतिक विकास आणि समृद्धी पुढाकार (Women’s Global Development and Prosperity Initiative - W-GDP) अंतर्गत 'प्रोजेक्ट किराणा (Project Kirana)' सुरू करण्यासाठी भागीदारी केली आहे.
ठळक मुद्दे
-
महिला उद्योजकांची वाढ आणि भरभराट यासाठी सदर प्रकल्पाचे अनावरण करण्यात आले आहे.
-
'प्रोजेक्ट किराणा' हा २ वर्षे कालावधीचा कार्यक्रम असून सुरुवातीला उत्तर प्रदेशातील काही निवडक शहरांमध्ये आणण्यात येईल.
मास्टरकार्डबाबत (Mastercard) महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स हे मास्टरकार्डच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
मुख्य कार्यकारी अधिकारी: अजय बंगा हे सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १९६६ मध्ये इंटरबँक कार्ड असोसिएशन म्हणून स्थापना. १९७९ मध्ये मास्टरकार्ड म्हणून नामकरण करण्यात आले होते.