-
हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यामार्फत गुरगावमधील वाढत्या वायू प्रदूषणाचा सामना करण्याच्या उद्देशाने ‘प्रोजेक्ट एअर केअर (Project Air Care)’ चे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी गुरगांवमध्ये ६५ विंग ऑगमेंटेशन एअर प्युरिफाईंग युनिट्स (Wing Augmentation Air Purifying Units - WAYU) उच्च हवा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Indices - AQI) असलेल्या भागात स्थापन करण्यात येणार आहेत.
-
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (Council of Scientific & Industrial Research - CSIR), राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (National Environmental Engineering Research Institute - NEERI) आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (Indian Institute of Technology - IIT), मुंबई यांनी एअर प्युरिफायर्स विकसित केले आहेत.
हरियाणा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: सत्यदेव नारायण आर्य हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यमंत्री: मनोहर लाल खट्टर हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
राज्य दर्जा प्राप्त वर्ष: १९६६ साली हरियाणाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानीचे ठिकाण: चंदिगढ हे हरियाणाच्या राजधानीचे ठिकाण आहे.