• वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (Council of Scientific & Industrial Research - CSIR) - केंद्रीय औषध संशोधन संस्था (Central Drug Research Institute - CDRI) चे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. सुशांत कार यांना सोसायटी ऑफ बायोलॉजिकल केमिस्ट्स (Society of Biological Chemists), बेंगळुरू मार्फत 'प्रा. ए. एन. भादुरी मेमोरियल लेक्चर पुरस्कार (Prof. A N Bhaduri Memorial Lecture Award) - २०२०' ने सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • लेशमॅनिया डोनोवानीच्या (Leishmania Donovani) जगण्याची पद्धती निश्चित करण्याच्या योगदानाबद्दल त्यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

  • मॅक्रोफेज आणि व्हिस्रल लेशमॅनिआसिस (visceral leishmaniasis) अर्थात काला-आजार (Kala-Azar) च्या कारक एजंटला संक्रमित करणारा लेशमॅनिया डोनोवानी हा एक प्रोटोझोआ परजीवी आहे.