-
केंद्रीय रसायन व खते मंत्री श्री. डी.व्ही. सदानंद गौडा यांनी कर्नाटकमध्ये किंमत देखरेख व संसाधन विभागाच्या (Price Monitoring and Resource Unit - PMRU) स्थापनेची घोषणा केली.
ठळक मुद्दे
-
PMRU ची स्थापना कर्नाटक राज्य औषध नियंत्रण विभागाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय औषधी किंमत निर्धारण प्राधिकरण (National Pharmaceutical Pricing Authority - NPPA), औषधनिर्माण विभाग (Department of Pharmaceuticals), रसायन व खते मंत्रालय (Ministry of Chemicals and Fertilizers), भारत सरकारमार्फत करण्यात आली आहे.
-
PMRU ही NPPA ला औषधांच्या किंमतींवर देखरेख ठेवण्यासाठी मदत करेल, औषधांची उपलब्धता सुनिश्चित करेल आणि ग्राहक जागरूकता वाढवेल अशी अपेक्षा आहे.
कर्नाटक राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: बी.एस. येडियुरप्पा हे सध्या कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल: वजुभाई वाला हे सध्या कर्नाटक राज्याच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
राज्य स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची स्थापना झाली होती.
-
राजधानी: बेंगळुरू ही कर्नाटक राज्याची राजधानी आहे.