-
दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांची नुकतीच २०२१ सालच्या प्रतिष्ठीत 'महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी' एकमताने निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र भूषण निवड समितीमार्फत सदर पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
-
आशा भोसले या हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनासाठी सुप्रसिद्ध आहेत.
-
आशा भोसले यांची कारकीर्द १९४३ मध्ये सुरू झाली होती आणि ती ७ दशकांहून अधिक काळ अव्याहतपणे सुरु आहे.
-
संगीत इतिहासात सर्वाधिक गाणी संगीतबद्ध करण्यात येणाऱ्या कलाकार म्हणून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये त्यांची नोंद करण्यात आली आहे.
पुरस्कार प्राप्त
-
दादासाहेब फाळके पुरस्कार (२०००)
-
पद्मविभूषण (२००८)