• माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे कोविड-१९ मुळे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. 'प्रणवदा' म्हणून ते ओळखले जायचे. भारत सरकारमार्फत दुखवटा म्हणून ७ दिवसीय राज्य शोक जाहीर करण्यात आला आहे.

प्रणव मुखर्जी यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • भारताचे १३ वे राष्ट्रपती म्हणून त्यांनी २०१२ ते २०१७ या कालावधी दरम्यान कार्यभार सांभाळला होता.

  • भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

  • २००९ ते २०१२ दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.

  • २०१९ मध्ये त्यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

  • भारतरत्न पुरस्कार मिळवणारे ते ५ वे राष्ट्रपती होते.

ठळक मुद्दे

  • प्रणव मुखर्जी यांनी १९८२-८४ दरम्यान प्रथमच अर्थमंत्री म्हणून काम पाहिले होते.

  • १९८० मध्ये त्यांना राज्यसभेचे नेते म्हणून नामांकित करण्यात आले होते.

  • माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या अत्यंत विश्वासू मंत्रीगणांपैकी ते एक होते.

  • इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर त्यांना पक्षातून बाजूला करण्यात आल्यामुळे त्यांनी राष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेस नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. नंतर तो १९८९ मध्ये कॉंग्रेसमध्ये विलीन करण्यात आला.

  • १९९१ मध्ये नियोजन आयोगाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

  • १९९५ सालामध्ये त्यांनी परराष्ट्रमंत्री म्हणूनही काम पाहिले होते.

  • मुखर्जी यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund - IMF), जागतिक बँक (World Bank), आशियाई विकास बँक (Asian Development Bank - ADB) आणि आफ्रिकन विकास बँकेच्या (African Development Bank) गव्हर्नर पदावरही काम केले होते.