-
ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ एन. के. अर्थात नंद किशोर सिंग यांच्या हस्ते आपल्या 'पोर्ट्रेट्स ऑफ पॉवर: हाफ ए सेंचुरी ऑफ बिईंग
अॅट रिंगसाईड (Portraits of Power: Half a Century of Being at Ringside)' नावाच्या आत्मचरित्राचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाकरिता मोलाची भूमिका बजावणाऱ्या एन. के. सिंग यांच्या जीवनाचे वर्णन सदर पुस्तकात करण्यात आले आहे.
-
१५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून सध्या ते कार्यरत आहेत.
-
सदर पुस्तक रुपा पब्लिकेशन्स इंडियामार्फत (Rupa Publications India) प्रकाशित करण्यात आले आहे.
-
आपल्या जीवनात घडलेल्या समग्र वैयक्तिक आणि राष्ट्रीय चळवळींचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.
एन. के. सिंग यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
माजी पंतप्रधान श्री. अटल बिहारी वाजपेयी यांचे सचिव म्हणून त्यांनी पंतप्रधान कार्यालयात (Prime Minister’s Office - PMO) काम पहिले आहे.
-
जपानमधील भारतीय दूतावासात त्यांनी आर्थिक आणि वाणिज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
-
२०१६ मध्ये जपानमार्फत एन. के. सिंग यांना 'द ऑर्डर ऑफ द राइजिंग सन, गोल्ड अँड सिल्व्हर स्टार (The order of the Rising Sun, Gold and Silver Star)' हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.