• इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेमार्फत (India Post Payments Bank - IPPB) ग्राहकांच्या वंचित व अनारक्षित लोकसंख्येचा मोठा भाग मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana - PMJJBY)’ सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • IPPB तर्फे PNB मेटलाईफ इंडिया विमा कंपनीबरोबर (PNB MetLife India Insurance Company) भागीदारी करण्यात आली आहे.

  • विशेषत: दुर्गम भागातील गरीब तसेच वंचित लोकांना संरक्षण आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करणे, प्रमुख सदस्याचा बळी गेलेल्या कुटुंबांना सहकार्य करणे या उद्देशांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

IPPB बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IPPB म्हणजेच India Post Payments Bank अर्थात इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंक होय.

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: जे वेंकट्रमु हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे IPPB च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • बँकेचे अनावरण वर्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१८ मध्ये IPPB चे अनावरण करण्यात आले होते.