-
उत्तराखंड राज्यामध्ये डेहराडून महानगरपालिकेतर्फे 'प्लास्टिक लाओ मास्क ले जाओ (Plastic Lao MASK LE JAO)' या उपक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
प्लास्टिक कचर्याच्या धोक्यांविरूद्ध लढा देण्यासाठी तसेच कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी सदर उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
-
प्लास्टिक कचर्याच्या बदल्यात यामध्ये जवळपास ५ हजार मास्कचे वितरण करण्यात आले आहे.
उत्तराखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: ९ नोव्हेंबर २००० साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली होती.
-
मुख्यमंत्री: त्रिवेन्द्रसिंग रावत हे सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल: बेबी राणी मौर्य सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
राजधानी: उत्तराखंड राज्याच्या गैरसैंण (उन्हाळी) आणि देहरादून (हिवाळी) अशा २ राजधान्या आहेत.