• केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (Central Industrial Security Force - CISF) 'पेन्शनर्स कॉर्नर (Pensioners Corner)' नावाचे मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. निवृत्तीवेतनधारकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि एक महत्वपूर्ण उपाय म्हणून डिजीटल व्यासपीठावर आणण्यासाठी सदर मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • CISF या मोबाईल अ‍ॅपद्वारे माजी सैन्य दलाच्या जवानांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल ज्यांनी आपला अभिमान वाढवण्याच्या उद्देशाने देशासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले होते.

  • मोबाइल अ‍ॅपमध्ये अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणेचादेखील समावेश करण्यात आला आहे.

  • नोकरीच्या संधी आणि निवृत्तीवेतनधारकांना मिळणारे फायदे यासारख्या सर्व महत्त्वपूर्ण परिपत्रकांविषयीची माहिती यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाबाबत (CISF) महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: CISF म्हणजेच Central Industrial Security Force अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल होय.

  • महासंचालक: राजेश रंजन सध्या CISF च्या महासंचालक पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: १९६९ साली CISF ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे CISF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.