• झिम्बाब्वेच्या लेखिका सीतसी डांगरेंबगा यांना नुकतेच 'PEN पिंटर पुरस्कार (PEN Pinter Prize) २०२१' ने सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • त्या बुकर-शॉर्टलिस्टेड असून भ्रष्टाचाराविरोधात निषेध नोंदवताना हारे येथे गेल्या वर्षी त्यांना अटक करण्यात आली होती.

  • २०२० च्या बुकर पुरस्कारासाठी 'धिस मॉरनेबल बॉडी (This Mournable Body)' या त्यांच्या कृतीसाठी डांगरेंबगाला यांना नामांकन प्राप्त झाले होते.

  • पेन पिनटर पुरस्कार हा नोबेल-पुरस्कार विजेते नाटककार हॅरोल्ड पिन्टर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २००९ मध्ये स्थापन करण्यात आला होता.