• मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. शिवराजसिंह चौहान यांच्यामार्फत राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून मुलींकरिता ‘पंख (PANKH) अभियानाचे’ अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेंतर्गत बालिकांच्या सशक्तीकरण आणि वाढीसाठी सदर योजना सुरू करण्यात आली आहे.

  • ‘पंख अभियान’ हा वर्षभर कालावधीचा कार्यक्रम आहे.

  • पंख (PANKH) म्हणजेच

    • ‘P’ - Protection (संरक्षण)

    • ‘A’ - Awareness of their rights (हक्कांची जाणीव)

    • ‘N’ - Nutrition (पोषण)

    • ‘K’ - Knowledge (ज्ञान)

    • ‘H’ - Health (आरोग्य)

मध्य प्रदेश बाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान हे सध्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: आनंदीबेन पटेल सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राज्यनिर्मिती वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: भोपाळ ही सध्या मध्य प्रदेशची राजधानी आहे.

  • राज्याची विशेषता: मध्य प्रदेश हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.