-
भारतीय शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने संगीत आणि कला क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
ठळक मुद्दे
-
१९३० साली हरियाणामध्ये मध्ये त्यांचा जन्म झाला होता.
-
जसराज यांची संगीत कारकीर्द जवळपास ८ दशकांपर्यंत विस्तारली होती.
-
सबंध कारकीर्दीत त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
-
पंडित जसराज यांना १९७५ सालामध्ये भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री प्रदान करण्यात आला होता.
-
१९८७ मध्ये त्यांना 'संगीत नाटक अकादमी पुरस्काराने' गौरविण्यात आले होते.
-
भारत सरकारमार्फत देशातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात 'पद्मभूषण पुरस्कार' त्यांना २००० साली प्रदान करण्यात आला होता.