• राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्काराने गौरविण्यात येणाऱ्या ११९ व्यक्तींची यादी गृह मंत्रालयामार्फत नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान व अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, खेळ आणि नागरी सेवा या क्षेत्रांमध्ये सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

  • २०२१ मध्ये 'भारतरत्न' पुरस्कार कोणालाही मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पद्म विभूषण पुरस्कार विजेते

  • शिन्झो अबे, जपान (सार्वजनिक व्यवहार)

  • एस. पी. बालसुब्रमण्यम (मरणोत्तर), तमिळनाडू (कला)

  • डॉ. बी. एम. हेगडे, कर्नाटक (वैद्यकशास्त्र)

  • नरेंद्र सिंग कापानी (मरणोत्तर), यूएसए (विज्ञान)

  • मौलाना वहीदुद्दीन खान, दिल्ली (अध्यात्म)

  • बी. बी. लाल, दिल्ली (पुरातत्त्वशास्त्र)

  • सुदर्शन साहू, ओडीशा (कला)

पद्मभूषण पुरस्कार विजेते

  • कृष्णन नायर शांताकुमारी चित्रा, केरळ (कला)

  • तरुण गोगोई (मरणोत्तर), आसाम (सार्वजनिक व्यवहार)

  • चंद्रशेखर कंबारा, कर्नाटक (साहित्य)

  • सुमित्रा महाजन, मध्य प्रदेश (सार्वजनिक व्यवहार)

  • नृपेंद्र मिश्रा, उत्तर प्रदेश (नागरी सेवा)

  • रामविलास पासवान (मरणोत्तर), बिहार (सार्वजनिक व्यवहार)

  • केशुभाई पटेल (मरणोत्तर), गुजरात (सार्वजनिक व्यवहार)

  • कलबे सादिक (मरणोत्तर), उत्तर प्रदेश (अध्यात्म)

  • रजनीकांत देवीदास श्रॉफ, महाराष्ट्र (व्यापार)

  • तरलोचन सिंग, हरियाणा (सार्वजनिक व्यवहार)

महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते

पद्मभूषण पुरस्कार

  • रजनीकांत देवीदास श्रॉफ (व्यापार)

पद्मश्री पुरस्कार

  • सिंधुताई सपकाळ (सामाजिक कार्य)

  • गिरीश प्रभुणे (सामाजिक कार्य)

  • नामदेव कांबळे (साहित्य)

  • परशुराम गंगावणे (कला)

  • जसवंतीबेन पोपट (उद्योग)