• 'पढाई तुहार परा' या नावाने विद्यार्थी केंद्रित योजना सुरू करण्याची घोषणा छत्तीसगड सरकारने केली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर योजना ही विद्यार्थी केंद्रित स्वरूपाची असल्याने अत्यंत महत्वाची आहे.

  • कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शालेय विद्यार्थ्यांचे होणारे वर्गाचे निलंबन लक्षात घेता त्यांच्या परिसरातील आणि खेड्यातील समुदायांच्या मदतीने त्यांना अभ्यास करण्यास या योजनेमुळे मदत होईल.

छत्तीसगड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: भूपेश बाघेल हे सध्या छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: अनुसुइया उइके सध्या छत्तीसगड राज्याच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर २००० रोजी छत्तीसगड राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: रायपूर ही छत्तीसगड राज्याची राजधानी आहे.

  • अधिकृत भाषा वापर: छत्तीसगड मध्ये छत्तीसगढ़ी आणि हिंदी या भाषांचा अधिकृत भाषा म्हणून वापर करण्यात येतो.