-
२०२० सालाच्या 'असमानता कमी करण्याच्या वचनबद्धतेचा निर्देशांक [Commitment to Reducing Inequality (CRI) Index]' यादीमध्ये १५८ देशांच्या यादीमध्ये भारत १२९ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे
-
२०२० सालची निर्देशांकाची तिसरी आवृत्ती ही कोविड-१९ च्या काळातील असमानतेविरुद्ध लढा देण्यावर केंद्रित आहे.
-
सदर निर्देशांक क्रमवारीमध्ये नॉर्वे प्रथम स्थानावर विराजमान झाला आहे.
-
दक्षिण सुदान या निर्देशांकात १५८ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.
CRI निर्देशांकाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: CRI म्हणजेच Commitment to Reducing Inequality Index अर्थात असमानता कमी करण्याच्या वचनबद्धतेचा निर्देशांक होय.
-
निर्देशांक प्रसिद्धी कार्य: आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था ‘ऑक्सफॅम इंटरनॅशनल (Oxfam International)’ द्वारा 'डेव्हलपमेंट फायनान्स इंटरनॅशनलच्या (Development Finance International)' भागीदारीमध्ये सदर निर्देशांक प्रसिद्ध करण्यात येतो.
-
लक्ष केंद्रित कार्य: असमानता कमी करणे तसेच श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी करण्यासाठी सरकार त्यांच्या धोरणात्मक वचनबद्धतेद्वारे काय करत आहे यावर लक्ष केंद्रित करण्याचे कार्य पार पाडण्यात येते.