• ब्रिटनमध्ये स्थित भारतीय वंशाच्या प्लॅस्टिक सर्जन डॉ. जजिनी वर्गीस यांना नुकतेच 'आऊटस्टँडिंग यंग पर्सन (Outstanding Young Person) २०२०' ने सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • डॉ. जजिनी वर्गीस यांनी स्तन कर्करोगाचे निदान आणि उपचाराबाबत 'अविश्वसनीय' वैज्ञानिक योगदान दिले आहे.

  • एका ना-नफा धर्मादाय संस्थेमार्फत ‘आऊटस्टँडिंग यंग पर्सन ऑफ द वर्ल्ड (Outstanding Young Person of the World) २०२०’ पुरस्कारासाठी त्यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.

  • स्तन कर्करोगाने ग्रस्त असणाऱ्या कोट्यवधी महिलांचे जीवन सुखकर करण्याचा वैयक्तिक प्रयत्न करण्याच्या दृष्टीने वर्गीस यांना 'मेडिकल इनोव्हेशन (Medical Innovation)' प्रकारामध्ये मान्यता प्राप्त झाली आहे

  • २०२० च्या जपानमधील योकोहामा येथील जागतिक कॉंग्रेस मध्ये एका समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.