-
परदेशी कंपन्यांना भारतात व्यवसाय स्थापन करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी पाठिंबा देण्याच्या उद्देशाने ICICI बँकेमार्फत ‘इन्फायनाईट इंडिया (Infinite India)’ नावाच्या पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुढाकाराच्या माध्यमातून बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या (MNC) विभागातील आपले स्थान मजबूत करणे हे ICICI बँकेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
भारतात येणार्या परदेशी कंपन्यांशी भागीदारी करण्याच्या उद्देशाने तंत्रज्ञानाधारित सक्षम बाबींना अधिक मजबूत करणे हा या धोरणाचा गाभा आहे.
ICICI बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ICICI म्हणजेच Industrial Credit and Investment Corporation of India होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे ICICI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
अध्यक्ष: गिरीश चंद्र चतुर्वेदी हे सध्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.
-
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: संदीप बक्षी सध्या या पदावर कार्यरत आहेत.
-
बँकेची टॅगलाईनः 'हम है ना, खयाल आपका' ही ICICI बँकेची टॅगलाईन आहे.