• केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते ‘वन स्कूल वन आयएएस (One School One IAS)’ योजनेचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • राज्यातील सर्वोच्च शिक्षणतज्ज्ञ तसेच निवृत्त आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांनी मिळून बनलेल्या संस्थेमार्फत सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

  • नागरी सेवा ही केवळ उच्चभ्रू वर्गासाठी आहे या सर्वसाधारण कल्पनेचे खंडन करण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला आहे.

केरळ राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्य दर्जा प्राप्त वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी केरळला राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: तिरुवनंतपूरम ही केरळ राज्याची सध्याची राजधानी आहे.

  • राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान हे केरळच्या राज्यपाल पदावर आहेत.

  • मुख्यमंत्री: पिनाराई विजयन हे सध्या केरळच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.