• यंदाच्या २०२१ सालच्या प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित झालेल्या सर्व चित्ररथांमध्ये उत्तर प्रदेशच्या राम मंदिराला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला आहे.

ठळक मुद्दे

  • ‘अयोध्याः उत्तर प्रदेशचा सांस्कृतिक वारसा (Ayodhya: Cultural Heritage of Uttar Pradesh)’ ही उत्तर प्रदेशच्या चित्ररथाची थीम होती.

  • प्राचीन शहर असणाऱ्या अयोध्याचा सांस्कृतिक वारसा, राम मंदिर प्रतिकृती तसेच रामायण या महाकाव्यातील विविध कथांचे दर्शन याद्वारे घडवून आणले गेले.

  • त्रिपुराच्या चित्ररथाने दुसरे पारितोषिक जिंकले.

  • उत्तराखंडच्या ‘देवभूमी - देवांची भूमी (Dev Bhoomi - The Land of the Gods)’ या थीमवरील चित्ररथाला तिसऱ्या क्रमांकाचा मान मिळाला.