• आर्थिक सहकार आणि विकास संघटना (Organisation for Economic Co-operation and Development - OECD) देशांमध्ये जाण्याच्या आणि त्या देशांचे नागरिकत्व मिळविण्याच्या क्रमवारी संदर्भात भारताने दुसरे स्थान मिळवले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर क्रमवारीमध्ये चीनने आपले अव्वल स्थान अबाधित राखले आहे.

  • २०१९ च्या अहवालाच्या तुलनेत हे प्रमाण १ टक्क्याने कमी आहे.

OECD आंतरराष्ट्रीय स्थलांतर आऊटलुक अहवालाबाबत (International Migration Outlook Report) महत्वपूर्ण माहिती

  • सदर वार्षिक अहवालाची २०२० सालाची ही ४४ वी आवृत्ती आहे.

  • जाहीर करण्यात आलेल्या या आकडेवारीच्या माध्यमातून OECD देशांमधील स्थलांतराच्या हालचाली आणि धोरणांमधील घडामोडींचे विश्लेषण स्पष्ट होते.

  • भारतातून जवळपास ३.३ लाख प्रवासी स्थलांतरित झाले आहेत.

  • अहवालाच्या मागील आवृत्तीपेक्षा हे प्रमाण १० टक्क्यांनी अधिक आहे.

OECD बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: OECD म्हणजेच Organisation for Economic Co-operation and Development अर्थात आर्थिक सहकार आणि विकास संघटना होय.

  • स्थापना वर्ष: १९४८ साली OEEC म्हणून तर १९६१ साली पुनर्रचना होऊन OECD नावाने स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे OECD च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सरचिटणीस: जोसे एंजेल गुरिया सध्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • सदस्य देश: OECD चे सध्या ३७ सदस्य देश आहेत.

  • संस्थेचा प्रकार: आंतरशासकीय संघटना या स्वरूपात ही संस्था कार्यरत आहे.