• 'पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणामार्फत (Pension Fund Regulatory and Development Authority - PFRDA)' १ ऑक्टोबर २०२१ रोजी 'राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस (National Pension System Diwas)' साजरा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • पेन्शन आणि सेवानिवृत्ती नियोजनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत PFRDA मार्फत सदर मोहीम सुरू करण्यात आली आहे.

PFRDA बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: PFRDA म्हणजेच 'Pension Fund Regulatory and Development Authority' अर्थात 'पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण' होय.

  • स्थापना वर्ष: २३ ऑगस्ट २००३ रोजी PFRDA ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे PFRDA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सध्याचे अध्यक्ष: सुप्रतीम बंडोपाध्याय हे सध्या PFRDA च्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.