-
हिपॅटिटिस-सी (Hepatitis-C) विषाणूच्या शोधासाठी हार्वे जे. आल्टर (अमेरिका), चार्ल्स एम. राईस (अमेरिका) आणि मायकेल ह्यूटन (ब्रिटन) यांना संयुक्तपणे शरीरविज्ञान (Physiology) किंवा औषध (Medicine) क्षेत्रामधील २०२० सालाचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
नोबेल समितीचे प्रमुख थॉमस पर्लमन यांच्यामार्फत स्टॉकहोममधील या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.
-
सामान्य लोकांमध्ये सिरोसिस आणि यकृत कर्करोगास कारणीभूत ठरणारी जागतिक स्वरूपाची आरोग्य समस्या अर्थात रक्त-जनित हिपॅटिटिसविरूद्धच्या (Blood-borne Hepatitis) लढ्यात निर्णायक योगदान देणार्या या ३ शास्त्रज्ञांना २०२० वर्षातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.
नोबेल पुरस्कारांबाबत महत्वपूर्ण माहिती
-
प्रथम पुरस्कार प्रदान वर्ष: १९०१ साली पहिल्यांदा नोबेल पुरस्कारांचे वितरण करण्यात आले होते.
-
पुरस्कार प्रदानकर्ता देश: स्वीडन मार्फत शांती पुरस्कार वगळता इतर सर्व पुरस्कार देण्यात येतात तर नॉर्वेमार्फत केवळ शांती पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
-
पुरस्कार प्रदान स्मृती: स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेलच्या स्मृतीप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
-
पुरस्काराचे स्वरूप: सुवर्ण पदकासह १० दशलक्ष स्वीडिश क्रोनर (१११८००० डॉलर्स पेक्षा जास्त) मानधनासह सन्मानित करण्यात येते.
-
पुरस्कार प्रदान क्षेत्रे: रसायनशास्त्र, साहित्य, शांती, भौतिकशास्त्र आणि शरीरशास्त्र किंवा औषधशास्त्रातील मानवतेसाठीच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सदर पुरस्कार वितरित करण्यात येतो.