• २०२० सालाचे भौतिकशास्त्रमधील (Physics) नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे

  • कृष्णविवर (Black Hole) तयार होणे म्हणजे सापेक्षतेच्या सर्वसाधारण सिद्धांताची (General Theory of Relativity) एक भक्कम स्वरूपाची भविष्यवाणी असल्याचे शोधून काढल्याबद्दल रॉजर पेनरोझ यांना हा पुरस्कार मिळत आहे.

  • आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी एक सुपरमॅसिव्ह कॉम्पॅक्ट ऑब्जेक्ट (Supermassive Compact Object) शोधण्याच्या उल्लेखनीय कार्यासाठी रेनहार्ड गेन्झेल आणि अँड्रिया गेझ यांना हा पुरस्कार मिळत आहे.

  • भौतिकशास्त्रातील २०२० सालाचे हे नोबेल पारितोषिक स्वीडनच्या स्टॉकहोम येथील रॉयल स्वीडीश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस (The Royal Swedish Academy of Sciences) या संस्थेमार्फत प्रदान करण्यात आले आहे.

रॉजर पेनरोझ यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • १९५७ साली ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठातून (University of Cambridge) पीएचडी धारक

  • ऑक्सफर्ड विद्यापीठ (University of Oxford), यूके येथील प्राध्यापक

रेनहार्ड गेन्झेल यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • १९७८ साली जर्मनीच्या बॉन विद्यापीठातून (University of Bonn) पीएचडी धारक

  • जर्मनीच्या मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर एक्स्ट्रास्टेरिस्ट्रियल फिजिक्सचे (Max Planck Institute for Extraterrestrial Physics) संचालक

  • कॅलिफोर्निया विद्यापीठ (University of California), अमेरिकामध्ये प्राध्यापक

अँड्रिया गेझ यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • १९९२ साली कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (California Institute of Technology), यूएसए मधून पीएचडी धारक

  • अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे (University of California) प्राध्यापक

नोबेल पुरस्कारांबाबत महत्वपूर्ण माहिती

  • प्रथम पुरस्कार प्रदान वर्ष: १९०१ साली पहिल्यांदा नोबेल पुरस्कारांचे वितरण करण्यात आले होते.

  • पुरस्कार प्रदानकर्ता देश: स्वीडन मार्फत शांती पुरस्कार वगळता इतर सर्व पुरस्कार देण्यात येतात तर नॉर्वेमार्फत केवळ शांती पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

  • पुरस्कार प्रदान स्मृती: स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेलच्या स्मृतीप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

  • पुरस्काराचे स्वरूप: सुवर्ण पदकासह १० दशलक्ष स्वीडिश क्रोनर (१११८००० डॉलर्स पेक्षा जास्त) मानधनासह सन्मानित करण्यात येते.

  • पुरस्कार प्रदान क्षेत्रे: रसायनशास्त्र, साहित्य, शांती, भौतिकशास्त्र आणि शरीरशास्त्र किंवा औषधशास्त्रातील मानवतेसाठीच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सदर पुरस्कार वितरित करण्यात येतो.