-
२०२० सालाचा साहित्यातील नोबेल पारितोषिक अमेरिकन कवी लुईस ग्लॅक यांना जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
साहित्यातील २०२० सालाचा हा नोबेल पुरस्कार स्वीडीश अॅकॅडमी (The Swedish Academy), स्टॉकहोमतर्फे जाहीर करण्यात आला आहे.
लुईस ग्लॅक यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
१९४३ मध्ये अमेरिकन कवी लुईस ग्लॅक यांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला होता.
-
लेखनाव्यतिरिक्त त्या येल विद्यापीठामध्ये (Yale University) इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
-
अमेरिकन समकालीन साहित्यातील एक प्रमुख कवी म्हणून त्यांची ख्याती निर्माण झाली आहे.
-
ग्लॅक यांना पुलित्झर पुरस्कार (१९९३), नॅशनल बुक अॅवॉर्ड (२०१४) यांसारखे अनेक प्रतिष्ठीत पुरस्कार मिळाले आहेत.