• रसायनशास्त्रातील २०२० सालाचे नोबेल पारितोषिक इमॅन्युएल चार्पेंटीयर आणि जेनिफर ए. दौडना यांना 'जीनोम एडिटिंग पद्धतीच्या विकासासाठी (The development of a method for genome editing)' जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक हे स्वीडनच्या स्टॉकहोम येथील 'रॉयल स्वीडीश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस (The Royal Swedish Academy of Sciences)' या संस्थेमार्फत प्रदान करण्यात आले आहे.

पुरस्कार विजेत्यांबाबत महत्वपूर्ण माहिती

इमॅन्युएल चार्पेंटीयर (Emmanuelle Charpentier)

  • १९९५ साली पॅरिसमधील 'पाश्चर इन्स्टिट्यूट (Pasteur Institute)' येथून पीएचडी धारक

  • जर्मनीच्या बर्लिन येथील 'मॅक्स प्लँक युनिट फॉर द सायन्स ऑफ पॅथोजेन्स (Max Planck Unit for the Science of Pathogens)' येथे संचालक

जेनिफर ए. दौडना (Jennifer A. Doudna)

  • १९८९ साली अमेरिकेच्या बोस्टनमधील 'हार्वर्ड मेडिकल स्कूल (Harvard Medical School)' मधून पीएचडी धारक

  • बर्कले, यूएसए येथील 'कॅलिफोर्निया विद्यापीठ (University of California)' मध्ये प्राध्यापक आणि 'हॉवर्ड ह्युज मेडिकल इन्स्टिट्यूट (Howard Hughes Medical Institute)' येथे अन्वेषक

नोबेल पुरस्कारांबाबत महत्वपूर्ण माहिती

  • प्रथम पुरस्कार प्रदान वर्ष: १९०१ साली पहिल्यांदा नोबेल पुरस्कारांचे वितरण करण्यात आले होते.

  • पुरस्कार प्रदानकर्ता देश: स्वीडन मार्फत शांती पुरस्कार वगळता इतर सर्व पुरस्कार देण्यात येतात तर नॉर्वेमार्फत केवळ शांती पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

  • पुरस्कार प्रदान स्मृती: स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेलच्या स्मृतीप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

  • पुरस्काराचे स्वरूप: सुवर्ण पदकासह १० दशलक्ष स्वीडिश क्रोनर (१११८००० डॉलर्स पेक्षा जास्त) मानधनासह सन्मानित करण्यात येते.

  • पुरस्कार प्रदान क्षेत्रे: रसायनशास्त्र, साहित्य, शांती, भौतिकशास्त्र आणि शरीरशास्त्र किंवा औषधशास्त्रातील मानवतेसाठीच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सदर पुरस्कार वितरित करण्यात येतो.