• नॉर्वेजियन नोबेल समितीमार्फत 'वर्ल्ड फूड प्रोग्रामला (World Food Programme - WFP)' २०२० सालासाठीचा शांततेचा नोबेल पुरस्कार (Nobel Peace Prize) जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • 'वर्ल्ड फूड प्रोग्राम' ही जागतिक स्तरावरील सर्वात मोठी मानवतावादी संस्था म्हणून कार्यरत आहे.

  • सदर संस्थेमार्फत उपासमारीच्या प्रश्नाला वाचा फोडण्याची आणि अन्नसुरक्षेला प्रोत्साहन देण्याची उल्लेखनीय जबाबदारी पार पाडली जात आहे.

वर्ल्ड फूड प्रोग्रामबाबत (World Food Programme) महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९६१ साली सदर संस्थेची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: इटलीमधील रोम हे संस्थेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सध्याचे अध्यक्ष: डेव्हिड बीस्ले हे सध्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

  • संस्थेचा प्रकार: आंतरसरकारी, नियामक आणि सल्लागार अशा स्वरूपात ही संस्था कार्यरत आहे.

  • पालक संस्था: संयुक्त राष्ट्र आमसभा ही वर्ल्ड फूड प्रोग्रामची पालक संस्था आहे.