• सेंद्रीय कापूस उत्पादकांसाठी भारतीय स्टेट बँक (State Bank of India - SBI) सध्या 'सफल (SAFAL)' नावाचे कर्ज उत्पादन बाजारात आणण्याच्या विचारात आहे.

ठळक मुद्दे

  • सुरक्षित आणि जलद कृषी कर्ज (Safe and Fast Agriculture Loan - SAFAL) उत्पादन प्रामुख्याने सेंद्रीय कापूस उत्पादकांवर केंद्रित करण्यात आले आहे ज्यांचा कोणत्याही स्वरूपाचा क्रेडीट इतिहास नाही.

  • SBI मार्फत यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) आणि मशीन लर्निंग (Machine Learning - ML) यांचा वापर करण्यात येणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाबाबत (State Bank of India - SBI) महत्वपूर्ण माहिती

  • अध्यक्षः रजनीश कुमार हे सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १ जुलै १९५५ रोजी बँकेची स्थापना झाली होती.

  • संस्थेचे स्वरूप: सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांतर्गत येणारी संस्था असे बँकेचे स्वरूप आहे.

  • सेवा प्रदान: बँकिंग व आर्थिक सेवा बँकेमार्फत पुरवल्या जातात.