• इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेतर्फे(India Post Payments Bank - IPPB) पोस्ट ऑफिस (Department of Posts - DoP) समवेत डिजीटल वित्तीय समावेश मिळण्याच्या उद्देशाने‘डाकपे (DakPay)’ नावाच्या डिजीटल पेमेंट अ‍ॅप्लिकेशनचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • केंद्रीय संप्रेषण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कायदा व न्याय मंत्री श्री. रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते सदर अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे.

  • सदर अ‍ॅप हे पोस्ट ऑफिस आणि IPPB ग्राहकांना सुलभ डिजीटल व्यवहार आणि इतर बँकिंग व टपाल सेवांमध्ये मदत करेल अशी अपेक्षा आहे.

IPPB बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IPPB म्हणजेच India Post Payments Bank अर्थात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक होय.

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: जे वेंकटरामू हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे IPPB च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: २०१८ साली IPPB ची स्थापना करण्यात आली होती.