• 'राष्ट्रीय कमोडिटी आणि डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज लिमिटेडमार्फत (National Commodity and Derivatives Exchange Limited - NCDEX)' नुकतेच 'GUAREX' नावाच्या भारताच्या पहिल्या कृषी क्षेत्रीय निर्देशांकाचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • GUAREX हा एक मुल्याधारित क्षेत्रीय निर्देशांक आहे.

  • सदर निर्देशांक उत्पादन मूल्य साखळीला भरपूर संधी देईल अशी अपेक्षा आहे.

NCDEX बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: NCDEX म्हणजेच 'National Commodity and Derivatives Exchange Limited' अर्थात 'राष्ट्रीय कमोडिटी आणि डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज लिमिटेड' होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे NCDEX च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • मुख्य कार्यकारी अधिकारी: विजयकुमार वेंकटरामन हे सध्या NCDEX च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १५ डिसेंबर २००३ रोजी NCDEX ची स्थापना करण्यात आली होती.