• लष्करी नर्सिंग सेवेच्या उपमहासंचालक असणाऱ्या ब्रिगेडियर एस. व्ही. सरस्वती यांना नुकतेच 'राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार (National Florence Nightingale Award)' २०२० ने सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • 'राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार' हा एका परिचारिकेला मिळू शकणारा सर्वोच्च असा राष्ट्रीय पुरस्कार आहे.

  • नर्स प्रशासक म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यामार्फत ब्रिगेडियर सरस्वती यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.