-
नुकतीच सुधा पैणुली यांची २०२० सालच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. २०२० साठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी निवडण्यात आलेल्या ४७ शिक्षकांमधून त्यांनी या पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे.
ठळक मुद्दे
-
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्वतंत्र मंडळाद्वारे या शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
-
आदिवासी कामकाज मंत्रालयांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या एकलव्य मॉडेल निवासी शाळेमधून (Eklavya Model Residential Schools - EMRS) राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळवणाऱ्या सुधा पैणुली या पहिल्याच शिक्षिका बनल्या आहेत.
-
डेहरादून, उत्तराखंड मधील EMRS-कलसीची स्थापना झाल्यापासून त्या तिथे उपप्राचार्य पदावर कार्यरत आहेत.
-
एकलव्य आदिवासी संग्रहालय, एकलव्य बर्थ डे गार्डन, कौशल्य विकास कार्यशाळा इ.नाविन्यपूर्ण प्रयोगांकरिता त्यांची निवड करण्यात आली आहे.