• आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यामार्फत राज्य परिवहन विभागाच्या 'मुख्यमंत्रीर ग्राम्य परिबहन अचोनी योजनेचे (Mukhyamantrir Grammya Paribahan Achoni)' अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • ग्रामीण भागाशी संपर्क सुधारण्यासाठी आणि खेड्यांमध्ये रोजगार निर्मितीसाठी सदर योजनेंतर्गत राज्यात सर्व गावात लाईट मोटर वाहन सेवा (Light Motor Vehicle Service) सुरू करण्यात येणार आहे.

  • प्रत्येक गावात एका लाभार्थ्याला एक वाहन देण्यात येईल अशी सदर योजनेत सोय करण्यात आली आहे.

आसामबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राजधानी: दिसपूर ही सध्या आसामची राजधानी आहे.

  • राज्यपाल: जगदीश मुखी हे सध्या राज्यपाल पदावर आहेत.

  • मुख्यमंत्री: सर्वानंद सोनोवाल हे सध्या मुख्यमंत्री पदावर आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: २६ जानेवारी १९५० रोजी आसामला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.