-
दिल्ली मंत्रिमंडळातर्फे नुकतीच ‘मुख्यमंत्री विज्ञान प्रतिभा परीक्षा (Mukhyamantri Vigyan Pratibha Pariksha)’ योजनेस मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर योजनेनुसार दिल्लीच्या शाळांमधील इयत्ता ९ वीच्या १००० गुणवंत लाभार्थी विद्यार्थ्यांना विज्ञान शिष्यवृत्ती म्हणून ५००० रुपये देण्यात येतील.
-
शालेय स्तरावर माध्यमिक वर्गात या शिष्यवृत्तीमुळे विज्ञान शिक्षणाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
-
उत्कृष्ट आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचे महत्वपूर्ण पाऊल असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.