• गुजरात सरकारने नुकतीच 'मुख्यमंत्री महिला उत्कर्ष योजना (Mukhyamantri Mahila Utkarsh Yojana - MMUY)' सुरू केली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर योजनेअंतर्गत राज्यातील महिला गटांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल.

  • योजनेचा एक भाग म्हणून शहरी भागात ५०००० संयुक्त दायित्व व कमाई गट ( Joint Liability and Earning Group - JLEG) स्थापन करण्यात येतील.

  • ग्रामीण भागातही असे ५०००० गट तयार करण्यात येतील अशी अपेक्षा आहे.

गुजरात राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: विजयभाई आर. रुपाणी हे सध्या गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.

  • राज्यपाल: आचार्य देव व्रत हे सध्या गुजरातच्या राज्यपाल पदावर आहेत.

  • स्थापना वर्ष: १ मे १९६० रोजी गुजरात राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने गुजरातचा देशात ५ वा क्रमांक लागतो