• उत्तराखंडचे मुख्यमंत्री श्री. त्रिवेन्द्रसिंग रावत यांच्या हस्ते 'मुख्य मंत्री सौर स्वरोजगार योजनेचे (Mukhya Mantri Saur Swarojgar Yojana)' नुकतेच अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सध्याच्या घडीला युवकांच्या रोजगारासंबंधीच्या प्रयत्नांना उत्तेजन देणे तसेच हरित ऊर्जेच्या उत्पादनास प्रोत्साहन देणे या महत्वाच्या उद्देशांसाठी सदर योजनेचे अनावरण करण्यात आले आहे.

  • कोविड-१९ साथीच्या आजारामुळे देशाच्या विविध भागातून नोकरी सोडणे भाग पडले होते अशा मुख्यतः तरूण आणि स्थलांतरित कामगार यांचा या योजनेच्या लक्ष्यित लाभार्थ्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

उत्तराखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: ९ नोव्हेंबर २००० साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली होती.

  • मुख्यमंत्री: त्रिवेन्द्रसिंग रावत हे सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: बेबी राणी मौर्य सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राजधानी: उत्तराखंड राज्याच्या गैरसैंण (उन्हाळी) आणि देहरादून (हिवाळी) अशा २ राजधान्या आहेत.