• भारत आणि इस्राईलमार्फत पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम-टप्पा क्षेपणास्त्राची (Medium-Range Surface-to-Air Missile - MRSAM) यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • MRSAM क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा ही DRDO आणि इस्राईल एरोस्पेस इंडस्ट्रीज (Israel Aerospace Industries - IAI) यांनी संयुक्तपणे शत्रू राष्ट्रांच्या हवाई हल्ल्याचा सामना करण्यासाठी विकसित केली आहे.

DRDO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: DRDO म्हणजेच Defence Research and Development Organisation अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था होय.

  • अध्यक्ष: डॉ. जी. सतीश रेड्डी हे सध्या DRDO चे अध्यक्ष आहेत.

  • स्थापना वर्ष: १९५८ साली DRDO ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे DRDO चे मुख्यालय आहे.

  • संस्थेचे ब्रीदवाक्य: 'बलस्य मूलं विज्ञानम्' हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.