• ओडीशा राज्याचे मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईक यांच्या तर्फे शेतकऱ्यांनी संबंधित कार्यालयांना भेट न देता सिंचन समस्या सोडविण्यासाठी 'सेचा समाधान (Secha Samadhan)' नावाच्या द्वैभाषिक मोबाईल अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर मोबाईल अ‍ॅपमुळे शेतकऱ्यांना जलसंपदा विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज भासणार नाही अशी अपेक्षा आहे.

  • छायाचित्र किंवा व्हिडीओद्वारे त्यांना तक्रारी पाठवण्याची सुविधा यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  • शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारींच्या स्थितीविषयी एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल अशी सोय करण्यात आली आहे.

ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.