-
ओडीशा राज्याचे मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईक यांच्यामार्फत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे 'मो विद्युत (Mo Bidyut)' नावाचे वीज ग्राहक सेवा पोर्टल आणि मोबाईल अॅप सुरू करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर ऑनलाईन वीज ग्राहक सेवा पोर्टल हे राज्य सरकारच्या ५ T (Teamwork, Transparency, Technology, Time leading to Transformation) उपक्रमांतर्गत समग्र जनतेला समर्पित करण्यात आले आहे.
-
नवीन विद्युत जोडणी घेण्यासाठी हे सेवा पोर्टल लोकांना अत्यंत सहाय्यक स्वरूपाचे ठरणार आहे.
-
ऑनलाईन बिलाची देयता आणि वीज सेवेसंबंधीच्या तक्रारी सोडवण्याची सुविधा या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.