• खाजगी क्षेत्रातील अग्रणी स्वरूपाच्या ICICI बँकेमार्फत आपल्या ग्राहकांसाठी 'ICICI बँक माईन (ICICI Bank Mine)' नावाच्या व्यापक बँकिंग उपक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • ‘ICICI बँक माईन’ हे हजारो ग्राहकांना अनोखा बँकिंग अनुभव देण्यासाठी बँकेमार्फत लाँच केलेले भारतातील पहिले आणि अद्वितीय स्वरूपाचे उत्पादन आहे.

ICICI बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ICICI म्हणजेच Industrial Credit and Investment Corporation of India होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे ICICI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: गिरीश चंद्र चतुर्वेदी हे सध्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: संदीप बक्षी सध्या या पदावर कार्यरत आहेत.

  • बँकेची टॅगलाईनः 'हम है ना, खयाल आपका' ही ICICI बँकेची टॅगलाईन आहे.