-
सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयामार्फत (Social Justice and Empowerment Ministry) टोल-फ्री मानसिक आरोग्य पुनर्वसन हेल्पलाईन 'किरण (KIRAN)' या नावाने सुरू करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
कोविड-१९ महामारीमुळे मानसिक आजाराची वाढती समस्या लक्षात घेता सदर हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
-
१८००-५००-००१९ हा हेल्पलाईन क्रमांक असून तो मानसिक आजारग्रस्त लोकांना आराम आणि मदत पुरवेल अशी अपेक्षा आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यालयाचे ठिकाण: सदर मंत्रालयाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
-
केंद्रीय मंत्री: श्री. थावरचंद गहलोत हे सध्या केंद्रीय मंत्री पदावर विराजमान आहेत.