-
हैदराबादच्या नीलकंठ भानू प्रकाशने माइंड स्पोर्ट्स ऑलिम्पियाड (Mind Sports Olympiad - MSO) मार्फत आयोजित मानसिक गणना विश्वचषकामध्ये (Mental Calculations World Cup - MCWC) भारतासाठीचे पहिले सुवर्णपदक जिंकले आहे.
ठळक मुद्दे
-
भानू प्रकाशने या स्पर्धेद्वारे एक नवीन सर्वकालीन विक्रम बनवला आहे
-
शकुंतला देवी आणि स्कॉट फ्लान्सबर्ग यांसारख्या महान लोकांप्रमाणेच त्याने एका विश्वविक्रमाची नोंद केली आहे.
-
स्पर्धेमध्ये भानू प्रकाशने १६७ गुणांसह सुवर्ण पदक, लेबनीज स्पर्धक मोहम्मद एल मीरने १०२ गुणांसह रौप्यपदक तर युएईच्या अस्मिता पालने १०० गुणांसह कांस्यपदक प्राप्त केले आहे.
नीलकंठ भानू प्रकाशबाबत महत्वपूर्ण माहिती
-
२० वर्षीय नीलकंठ भानू प्रकाश दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये गणित शिकणारा विद्यार्थी आहे.
-
जगातील सर्वात वेगवान मानवी कॅल्क्युलेटर म्हणून त्याच्या नावावर ४ जागतिक विक्रम आणि ५० लिम्का विक्रमांची नोंद करण्यात आलेली आहे.