• उत्तर प्रदेश सरकारने नुकतीच 'मेजर ध्यानचंद विजयपथ योजना' सुरू केली आहे. सदर योजनेंतर्गत उत्तर प्रदेश राज्यातील १९ आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना त्यांच्या घरापर्यंत रस्त्याची जोडणी करून मिळणार आहे.

ठळक मुद्दे

  • सदर योजनेतील लाभार्थी असणाऱ्या १९ आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार, पीयूष चावला आणि मोहम्मद कैफ यांचा समावेश करण्यात आला आहे.

  • योजनेच्या लाभार्थ्यांच्या सुरुवातीच्या या यादीमध्ये १९ खेळाडूंचा समावेश असून आगामी काळात अधिकाधिक खेळाडूंचा यात समावेश करण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: योगी आदित्य नाथ हे सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत.

  • राज्यपाल: आनंदीबेन पटेल या सध्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल म्हणून पदभार सांभाळत आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: २४ जानेवारी १९५० रोजी उत्तर प्रदेशला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर प्रदेश राज्याचा देशात चौथा क्रमांक लागतो.